घड्याळाचे काटे कुठे अडकलेत वाटतंय,
मिनिटे संपायची वाट पहात तासभर गेलाय
वेळेवरच दरवेळी पुढचं टाकून पाऊल,
आता वेळेलाही पुढे जायचा कंटाळा आलाय
मिनिटे संपायची वाट पहात तासभर गेलाय
वेळेवरच दरवेळी पुढचं टाकून पाऊल,
आता वेळेलाही पुढे जायचा कंटाळा आलाय
त्याच खिडकीतून येऊन आत राहिलीत लोळत
पडलेल्या हवेने जराही न हलता,
कंटाळ्यानेच थोड्याशा केलीये त्यांना चांगली सोबत
गच्च भरून साठलंय पाणी ढगांमध्ये,
कंटाळ्याने त्यांना त्यांचाच ओझं नाहीये झेपत
आळसावून वाट पहात बसलंय जणू,
कंटाळवाणा पाऊस, हट्टाने नाहीये अजिबात बरसत
कंटाळ्याने त्यांना त्यांचाच ओझं नाहीये झेपत
आळसावून वाट पहात बसलंय जणू,
कंटाळवाणा पाऊस, हट्टाने नाहीये अजिबात बरसत
सरळसोट, सपाट कंटाळवाण्या रस्त्याला त्या,
नाहीत अवघड चढ ना धडधडते उतार
त्यालाच त्याचा येतो कंटाळा आता,
कंटाळ्यानेच बदलासाठी होतच नाही तरी तयार
नाहीत अवघड चढ ना धडधडते उतार
त्यालाच त्याचा येतो कंटाळा आता,
कंटाळ्यानेच बदलासाठी होतच नाही तरी तयार
नसेलही यातलं कोणी कंटाळलेलं आत्ता,
माझी नजर बदलून तिकडे बघायला हवय
आत्ता नको जरा वेळाने बघू,
आत्ता ना मला जरा कंटाळा आलाय....
माझी नजर बदलून तिकडे बघायला हवय
आत्ता नको जरा वेळाने बघू,
आत्ता ना मला जरा कंटाळा आलाय....
No comments:
Post a Comment