Monday, 30 May 2011

तू आणि मी


कधी चुकून कधी मुद्दाम या बरोबर असण्याला विसरलं जातं... म्हणूनच,  ही साथ, सोबत ही किती महत्त्वाची असते, ते काही पुन्हा नव्याने सांगून बघायचंय!!

तुझं आणि माझं छोटसं आभाळ असावं
फाटलंच  ते कधी तर, दोघांनी मिळून सावरावं

तुझी आणि माझी, इवलीशी नदी असावी,
गेलीच वाहून  जर, तरी किनाऱ्याची कड उरावी

तुझी आणि माझी असावी एकच वाट,
साथ असेल आधाराला आली जरी वळणं अफाट

तुझे आणि माझे असावे ऋतू सारेच,
वेळेबरोबर बदलले जरी, आपले राहतील कायमचेच 

तुझा आणि माझा असावा मिणमिणता तारा,
तेवेल आपल्यासाठीच, आलाच एखादा जर क्षण अंधारा

तुझी आणि माझी दिसावी एकसारखीच सावली,
तू आणि मी नंतर उरणारच नाही वेगळी

तुझी आणि माझी जोडी अशीच फुलावी,
आपल्या देवाकडे आपली, इतकी एकाच मागणी असावी 

1 comment: