Monday, 13 June 2011

मन


"मन" काय आहे.. काय नाही वैज्ञानिक, अध्यात्मिक, मानसशास्त्रीय.... अनेक चर्चा होऊनही अनुत्तरीत राहिलेला, आपल्या सगळ्यांमधला अविभाज्य भाग! कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी मला समाजालाच नाही!!

मनालाही आवरेना, बेभान मनाची ही धाव,
वेगामागे वेडी, कशी मनाची या हाव!

विचारांची राही विणत वेडी साखळी साखळी
खुडूनही टाकी त्यांना जशी नकोशी पाकळी....

कधी बांधून इमले खाली आभाळ ठेउनी,
कधी उरेना त्याकडे, तुकडा मातीचा चौकोनी!

चुका करूनही पळे, त्याच चुकांच्याच पाठी,
सोडी तिथेच त्यांना, बंधूनी अनुभव गाठी!

ओढ अनामिक असताना, क्षणात नकोशीही होई,
नकोशी इच्छाही कधी, आपुली म्हणून घेई!!

कारण जगायचे शोधी, ठेवी उमेदीची आस,
दिसूनही अर्थ जीवनाचा, घेई शेवटचा ध्यास...

घालूनी कुलुपे कितीही, नाही राहत ताब्यात,
कधी, "उड" सांगूनही, राही अडकुनी कुंपणात!

काय हवेसे मनाला, कधी त्यालाच कळेना,
कधी मिळूनही वाटे, काही मनीचे मिळेना!!

कसे उकलावे गूढ, काय करावा इलाज,
स्पर्शूनही तळ, त्याच्या खोलीचा येईना अंदाज

2 comments: