आपण सगळेच आपल्या स्वप्नांवर जीव तोडून प्रेम करतो. अशाच एखाद्या जीवापाड जपलेल्या स्वप्नाला कधीतरी सोडून द्यावं लागलं तर?? कोणत्याही दुसऱ्या गोष्टीसाठी स्वप्नाची हि मोजायला लागलेली किंमत नक्कीच महाग पडते.... हो ना??
कधी साखरझोपेत अलगद बदलली कूस
कधी पाहिलेली आपल्याच झोपेची वाट
प्रत्येक स्वप्नाची किंमत लागते मोजावी,
आपणच बनवलेल्या स्वप्नाच्या या जगात
रापलेल्या उन्हात, पावलागणिक हरवतात सावल्या
प्रत्येक स्वप्नाची किंमत लागते मोजावी,
आपणच बनवलेल्या स्वप्नाच्या या जगात
रापलेल्या उन्हात, पावलागणिक हरवतात सावल्या
आणि पुरून उरतो एकाकी रस्ता
मनभर पसरलेला ध्यासही आटतो तेव्हा ,
उभारी विसरतो खाऊन खाऊन खस्ता
काळाबरोबर निसटते घट्ट धरलेली उमेद
मनभर पसरलेला ध्यासही आटतो तेव्हा ,
उभारी विसरतो खाऊन खाऊन खस्ता
काळाबरोबर निसटते घट्ट धरलेली उमेद
विझणाऱ्या आशेला आणखीनच करते फिकट
डोळ्यांदेखत अंधुक झालेल्या संधी बरोबरच,विश्वासाच्या कड्याही हळूहळू जातात निखळत
आपलेच ध्यास आणि आपलेच हट्ट,
आपलीच इच्छा आणि आपलीच जिद्द
स्वतःशीच स्वतःने दिलेला लढा अन,
प्रयत्नाची पार केलेली प्रत्येक हद्द
अथक प्रयत्नांच्या जोडीला केलेल्या प्रार्थना
स्वतःशीच स्वतःने दिलेला लढा अन,
प्रयत्नाची पार केलेली प्रत्येक हद्द
अथक प्रयत्नांच्या जोडीला केलेल्या प्रार्थना
त्यांनाही जेव्हा उत्तर नाही मिळत....
हातात नसलेल्या पण हातावर पसरलेल्या ,
नशिबाच्या रेघोट्यांच गणित जातं कळत
स्वप्नांच्या पलीकडल्या सत्याची धग परतवते,
कठोर पण शाश्वत या अस्तिवात ....
कधीकधी द्यावी लागते स्वप्नाचीच किंमत,
कधीकधी द्यावी लागते स्वप्नाचीच किंमत,
आपणच बनवलेल्या स्वप्नाच्या या जगात...
u never told me that u r a writer..hope u can make it in english too..........AK
ReplyDeleteMasta vishay ahe... ani kavita suddha...!
ReplyDelete